गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

             

प्रवास   

               आज संध्याकाळी ऑफिस मधनं घरी येत होतो. नेहमीसारखं bike  वरच होतो. आजूबाजूला पाहतच ride  करायची सवय आहे मला. असाच पाहता पाहता एका माणसाकडे लक्ष गेलं. त्याला घरीच जायचा असेल कदाचित. नायलॉन चा पोतं होतं त्याच्याकडे एक. रंग पांढरा. दिसायला खूप काही जड वगैरे नव्हतं.  

                पण तो शोधात होता. त्याला जिथे जायचं...तिथे जायचा साधन. तितक्यात माझ्याबाजूने सर्र्कन एक सवारी जीप गेली. त्याने तिच्याकडे पाहिलं, हात ही दाखवला. पण ती जीप ना थांबता सरळ निघून गेली. त्याने पण मग आपला लक्ष दुसरीकडे वळवलं. चेहऱ्यावर त्रासाचे कोणतेही भाव ना आणता. पुन्हा दुसरं साधन शोधण्यात तो मग्न झाला आणि मी पुढे निघून गेलो. 

                त्याक्षणी मनात एक विचार आला की का नाही माणसं आयुष्यात पण ह्याच गोष्टीची पुनुरावृत्ती करत. घडून गेलेल्या गोष्टी का विसरून जात नाहीत. का त्या आठवून  त्यांचा त्रागा करून स्वतःला त्रास करून घेतात. बस आपल्या गंतव्य स्थानावर जायची साधनं शोधत राहा आणि आनंदाने प्रवास सुरु ठेवा नाही का..... 

😊😊😊